ब्लॉग स्पर्धा - नियम व सूचना


ब्लॉग विषय: पदभ्रमंती, गिरिभ्रमंती, दुर्ग, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयन भ्रमंती, पर्वतारोहण, हिमालयीन मोहिमा, सह्याद्रीतील मंदिरे व लेणी, गिर्यारोहणातील सुरक्षा.

भाषा: मराठी

स्पर्धेसाठी लिखाणाचा ग्राह्य कालावधी: ६ जून २०२२ ते ०५ जून २०२३ या कालावधीतील लिखाण स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

अंतिम मुदत: ५ जून २०२३ (या तारखेनंतरच्या ब्लॉगवरील पोस्ट स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत).

निकष: विषय मांडणी, भाषा, ताजेपणा, लिखाणातील तांत्रिक अचूकता, लिखाणातील सातत्य, ब्लॉग मांडणी.

कृपया नोंद घ्यावी:
  1. ब्लॉगवरील सर्व लिखाण हे ब्लॉग लेखकाचे स्वत:चेच असणे आवश्यक आहे. लेखन स्वामित्व हक्काबाबत काही वाद असतील तर ते स्पर्धेत दाखल होण्यापूर्वीच जाहीर करणे बंधनकारक आहे. अशा स्वरूपातील लिखाणाचा समावेश स्पर्धेसाठी नाकारण्याचा पूर्ण हक्क आयोजक व परीक्षकांना असेल.
  2. लेखन स्वामित्व हक्क संदर्भात काही वाद उत्पन्न झाल्यास त्यास गिरिमित्र संमेलन जबाबदार राहणार नाही.
  3. ब्लॉगवरील छायाचित्रे ही जर ब्लॉग लेखकाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाची असतील तर तसे छायाचित्र सौजन्य नमूद करणे अपेक्षित आहे. असे न करण्याने जर सदर छायाचित्रकाराने त्यावर आक्षेप घेतला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ब्लॉग लेखकाची असेल. गिरिमित्र संमेलन यासाठी जबाबदार राहणार नाही.
  4. ब्लॉगवरील लिखाण कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, समाजाच्या अथवा व्यक्तिगत भावना दुखाविण्याचा प्रयत्न केलेले नसावे. अशा स्वरूपातील लिखाणाचा समावेश स्पर्धेसाठी नाकारण्याचा पूर्ण हक्क आयोजक व परीक्षकांना असेल.
  5. एखाद्या ब्लॉगवर जर स्पर्धेच्या विषयांव्यतिरिक्त अन्य विषयांवर पोस्ट असतील तर स्पर्धेच्या विषया संबधित पोस्ट एकत्रित करून त्याची लिंक द्यावी. जेणेकरून परीक्षकांना सोयीस्कर होऊ शकेल. यासाठी खालील टूल्सचा आधार घ्यावा.
    Wordpress Blog
    Google Blogger
  6. स्पर्धेत दाखल झालेल्या ब्लॉगवरील लिखाणाचे पुनःप्रकाशन संमेलन स्मरणिका, संमेलन वेबसाईट इ. माध्यमातून करण्याची मुभा गिरिमित्र संमेलनास असेल.
  7. परीक्षकांचे निकाल हे अंतिम व बंधनकारक असतील.

अधिक माहितीसाठी संपर्क:

संपदा कळमकर ९५६१४८२२३७

डॉ. विजय आहेर ९९६९३७७५२१

ब्लॉग स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

Google Form Link: https://forms.gle/CMSV8N9kJ5mE6hWk8