९ व १० जुलै २०२२
शनिवार आणि रविवार
महाराष्ट्र सेवा संघ
पं. जवाहरलाल नेहरू रस्ता, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८०.
दूरध्वनी: +९१-२२-२५६८१६३१
देणगी प्रवेशिका आता ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध. कृपया येथे भेट द्या.
या वर्षीच्या गिरिमित्र संमेलनातील मध्यवर्ती संकल्पना आहे, "गिर्यारोहणातील स्थित्यंतरे"
अभ्यासपूर्ण सादरीकरण, छायाचित्र, दृक्श्राव्य सादरीकरण तसेच ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा जाहीर झाली आहे. अधिक महितीसाठी तसेच प्रवेश अर्ज डाउनलोड करण्यासाठी कृपया येथे भेट द्यावी.
मिडिया गॅलरी (गिरीमित्र संमेलन २०१९) अद्ययावत करण्यात आली आहे, कृपया येथे भेट द्यावी.
१ जुलै २०१९ ते ३० जून २०२२ या दरम्यान आयोजित केलेल्या प्रस्तरारोहण आणि हिमालयीन मोहिमांचे माहिती संकलन आम्ही करीत आहोत.
अधिक माहिती साठी कृपया प्रकाश वाळवेकर यांच्याशी फ़ोन वारे (+91-9821194373) किंवा ईमेलद्वारे संपर्क करावा.
माहिती पाठविण्याची अंतिम तारीख ३० जून २०२२ आहे.
करोना आणि नैसर्गिक आपत्ती दरम्यान गिर्यारोहण संस्थानी केलेल्या मदतीचे संकलन
गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये करोना, निसर्ग, तौक्ते चकीवादळ आणि कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील महापूर अशा आपत्तींचा सामना महाराष्ट्राला करावा लागला. या काळात गिर्यारोहण संस्थांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले. या सर्व कामाची माहीती 19 व्या गिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने संकलित करण्यात येत असून, त्याचे सादरीकरण संमेलनात करण्यात येईल. कृपया सर्व संस्थांनी 30 जूनपर्यंत आपल्या कामाची माहीती या फॉर्ममध्ये भरून द्यावी.
अधिक माहीतीसाठी संपर्क प्रीती पटेल 9987990300 / राहुल मेश्राम 9833394047
नमस्कार गिरिमित्रांनो, तीन वर्षांनंतर आपल्याशी संवाद साधत आहोत. तसेही करोना काळात अन्य माध्यमातून आपण संपर्कात होतोच, पण आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गिरिमित्र संमेलनाची उणीव त्यामध्ये होती. दरवर्षी भर पावसाळ्यात एक दिवस डोंगरात भटकायचे बाजूला ठेऊन गेली १८ वर्षे आपण एकत्र जमत आहोत. करोनामुळे त्यामध्ये खंड पडला. अर्थातच करोनामुळे एकूणच आपल्या आजूबाजूला अनेक बदल झाले आहेत.
बदल हाच तर सृष्टीचा नियम आहे. उत्क्रांतीच्या प्रवासात, नागरीकरणाच्या ओघात अशी कैक स्थित्यंतरे आपल्याभोवती सातत्याने झाली आहेत, होत आहेत. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित. गिर्यारोहणदेखील त्यास अपवाद नाही. युद्ध, तीर्थयात्रा, व्यापार, रोजची कामे अशा अनेक स्वरूपांमध्ये होणाऱ्या डोंगर भटकंतीला २० व्या शतकाच्या मध्यावर गिर्यारोहण या साहसी खेळाचे स्वरूप प्राप्त झाले. तेव्हापासून गेल्या ६०-७० वर्षांत आपण असे अनेक बदल अनुभवले आहेत.
ज्या खुल्या निसर्गात, उत्तुंग गिरिशिखरांमध्ये आपण रममाण व्हायचो तेथील पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वेगवान झपाट्याने भटकंतीचे स्वरूप, परिभाषाच बदलून टाकली. एरवी कठीणप्राय समजली जाणारी ठिकाणे अनेक सुविधांनी सुलभ झाली. साहसी पर्यटनाने एक वेगळे विश्वच समोर आणले. तर पाच-पंचवीस डोकी एकत्र येऊन सुरू केलेल्या संस्थेच्या माध्यमातून होणारे गिर्यारोहण ते दोन-चारजणांची स्वतंत्ररित्या होणारी मोहीम, दुसरीकडे सर्वसिद्ध अशा व्यापारी मोहिमा अशी कैक स्थित्यंतरे आपल्यासमोरच झाली.
आज गिर्यारोहणाची साठी ओलांडलेल्या काळात या साऱ्याचा मागोवा घेणे म्हणूनच गरजेचे आहे. या सर्व स्थित्यंतरांमध्ये आज आपण नेमके कोठे उभे आहोत आणि नंतर कोणत्या दिशेने जाणार आहोत हे तपासणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच या बदलत्या काळात ‘गिर्यारोहणातील स्थित्यंतरे’ ही १९ व्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ठरविण्यात आली आहे.
अर्थातच कोणतेही स्थित्यंतर चांगले की वाईट हे येणारा काळच ठरवत असतो. भल्याबुऱ्यातून कशाची निवड करायची हे सूज्ञास सांगावे लागत नाही. मात्र नेमके काय झाले हे कधीतरी मांडणे गरजेचे असते, त्याचबरोबर भविष्याचा वेधदेखील घ्यावा लागतो त्यासाठीच हा खटाटोप. संमेलनाच्या सादरीकरणातून, चर्चासत्रांतून या स्थित्यंतरांची नोंद घेतली जाईलच.
इंडियन माऊंटेनिअरींग फाऊंडेशन - माजी अध्यक्ष
नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग - माजी प्राचार्य
इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशन - अध्यक्ष
गिरिमित्र संमेलनातील मान्यवर अतिथी व वक्ते
श्री. हरीश कपाडिया यांचा सन्मान
श्री. अनिल काकोडकर यांचा सन्मान
श्री. जॉन पोर्टर यांचा सन्मान
गिरीमित्र संमेलन श्रोते
गिरीमित्र संमेलन कार्यकर्ते
गिर्यारोहकांचा गिर्यारोहकांनी कृतज्ञेपोटी केलेला सन्मान" हे शब्द आहेत श्री शरद ओवळेकर यांचे. म्हणूनच गिर्यारोहकांचा केला जाणारा हा गौरव "गिरिमित्र सन्मान" म्हणून ओळखला जातो.
दर वर्षी संमेलनात विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात (छायाचित्रण, दृक्श्राव्य इत्यादी). त्या संदर्भातील माहिती, प्रवेश अर्ज व अर्जाची अंतिम तारीख वगैरे माहिती.
संमेलनाविषयी वृत्तपत्रामध्ये, सोशल मिडिया वरच्या बातम्या, व्हिडीओ, ब्लॉगवरील नोंदी व इतर माहिती यांचा खजिना.